जिल्ह्यात आजपर्यंत ९८ हजार ९७९ रुग्ण कोरोनामुक्त; ३ हजार ४३२ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९८ हजार ९७९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ३ हजार ४३२ रुग्णांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत १ हजार ८४०  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २०७, चांदवड ५२, सिन्नर ३१०,दिंडोरी ७८, निफाड २५२, देवळा २२, नांदगांव ७७, येवला ११, त्र्यंबकेश्वर ०३, सुरगाणा ०१, पेठ ००, कळवण १८,  बागलाण १३८, इगतपुरी १८, मालेगांव ग्रामीण १५ असे एकूण १ हजार २०२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ०४४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १४७  तर जिल्ह्याबाहेरील ३९ असे एकूण ३ हजार ४३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १ लाख ४  हजार २५१ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.७३,  टक्के, नाशिक शहरात ९५.६७ टक्के, मालेगाव मध्ये  ९२.७७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९०.९८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.९४  इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ७०२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ९२२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७२ व जिल्हा बाहेरील ४४ अशा एकूण १ हजार ८४०  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी आज सकाळी ११.००वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)