कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक ठरताय सुपर स्प्रेडर्स !

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाबाधित रूग्ण व त्याबरोबर असणारे नातेवाईक हे सुपरस्प्रेडर्स ठरत असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी म्हंटले आहे… ते म्हणाले, कोरोना बाधित मृत रूग्णांच्या अंत्यविधीची व्यवस्था शासकीय पातळीवरून करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

रूग्ण मृत पावला तर त्याचे नातेवाईक त्याचा नियमाप्रमाणे अंत्यविधी न करता त्यास गावी घेवून जातात व मोठ्या गर्दीत त्याचा अंत्यविधी पार पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अंत्य विधींमधूनही कोरोनाचा प्रसार होतो आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या अंत्यविधीची व्यवस्था शासकीय पातळीवर करता येण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.