नाशिक जिल्ह्यातील हॉटेल, बार आणि वाईन शॉपच्या वेळा वाढवल्या ! जाणून घ्या सविस्तर..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील हॉटेल, बार आणि वाईन शॉपच्या वेळा प्रशासनाने वाढवून दिल्या आहेत. जिल्ह्यात दुकानांसाठी सकाळी 7 ते 8,  मद्य विक्री करणारी हॉटेल/बारसाठी 11 ते 9, मद्य विक्री न करणाऱ्या हॉटेलसाठी सकाळी 8 ते 9 तसेच वाईन शॉप साठी सकाळी 9 ते 7 अशा वेळा त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित करण्यात आलेल्या होत्या.

मात्र शासनाने वरील अधिसूचनेच्या परि 5 मध्ये दिलेल्या सूचनांचा विचार करून तसेच या संदर्भात मा पालकमंत्री पोलीस आयुक्त मनपा आयुक्त पोलीस अधीक्षक या सर्वांशी चर्चा करून, आता या संदर्भातील यापूर्वीचे सर्व आदेश रद्द करून सर्व आस्थापनासाठी एकसमान सकाळी 9 ते रात्री 9 अशी वेळ उद्यापासून निश्चित करण्यात येत आहे.

जीवनावश्यक बाबींच्या आस्थापनासाठी वेळेची कोणतीही मर्यादा राहणार नाही. कंटेनमेंट झोनमधील आस्थापना साठी पूर्वीच्याच वेळेच्या मर्यादा व अन्य नियम कायम राहतील.