मालेगाव 1, संगमनेर 1 आणि नाशिक शहरात अजून 2 पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक(प्रतिनिधी): आज (गुरुवार दि. 21 मे 2020) सकाळी 11 वाजता प्राप्त झालेल्या अहवालांनुसार मालेगावच्या रसूलपुरा येथून एक 50 वर्षीय व्यक्ती, संगमनेरच्या निमोण येथील 78 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे नाशिक शहरातील आलिशान सोसायटी, वडाळा येथील 20 वर्षीय युवक आणि अंबड लिंक रोड येथील 73 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

वडाळा येथील युवक याआधी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहे. शहरात आढळून आलेल्या रुग्णांचे सविस्तर रहिवास पत्ते अजून प्राप्त झालेले नाहीत.