नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ९ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ९ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (दि. ९ जुलै) १६५ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ७३, नाशिक ग्रामीण: ७२, मालेगाव: ८, तर जिल्हा बाह्य: १२ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ९ जुलै) एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २, नाशिक ग्रामीण: ५, असा समावेश आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी एकूण १६६ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक झाली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे तूर्तास जिल्ह्यातील निर्बंध जैसे थे असेच ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लसीकरण वाढवण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.