नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ३१ मार्च) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; १८ जणांचा मृत्यू

नाशिक शहरात बुधवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ३१ मार्च) ३३०८ पॉझिटीव्ह कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तर एकूण १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये, नाशिक शहर: १७१९, नाशिक ग्रामिण: १४०४, मालेगाव: ११६, जिल्हा बाह्य: ६९ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये: नाशिक शहर: ५, नाशिक ग्रामिण: ११, जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे: १) सोमेश्वर, नाशिक,येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती, २) शिवाजी चौक, सिडको,येथील ७४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती, ३) २५,श्री गुरुकृपा,प्रशांत नगर, पाथर्डी फाटा,नाशिक येथील ६९ वर्षीय वृद्ध महिला, ४) रो हाऊस क्र.३, शिवशक्ती पार्क, शिवाजीनगर,सातपूर येथील ४२ वर्षीय महिला, ५) बाजीप्रभू चौक,सावता नगर,सिडको येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष यांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा.