नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ३ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ३ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांच्या संख्येत शनिवारी काही प्रमाणात वाढ बघायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अजून काही महिने तरी कोरोनाचे प्राथमिक नियम विसरून चालणार नाही. नाशिक जिल्ह्यात शनिवारी २३१ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ११६, नाशिक ग्रामीण: ११२ तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे शनिवारी कळविण्यात आलेले कोरोनामु झालेले मृत्यू १३ आहेत. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण १२ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ३४७ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू