नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २९ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २९ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २९ जून) १३० इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३९, नाशिक ग्रामीण: ८६, मालेगाव: ४ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण १७२ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक शहरात मंगळवार पासून दिवसा जमावबंदी तर सायंकाळी ५ ते पहाटे ५ वाजे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून सं’सर्ग रोखता यावा हा उद्देश आहे.