नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २८ एप्रिल) कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ; ३७ मृत्यू

नाशिक जिल्ह्यात बुधवारी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

corona nashik news

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २८ एप्रिल) ४८६९ इतक्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. यात नाशिक शहर: २४९८, नाशिक ग्रामीण: २१६१, मालेगाव: ११६, जिल्हा बाह्य: ९४ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे बुधवारी ६७२६ इतके कोरोना रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात नाशिक शहर: ६, मालेगाव: ३ तर नाशिक ग्रामीण: २८ असा समावेश आहे.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १)पाथर्डी फाटा,नाशिक येथील ५१ वर्षीय पुरुष, २) सानेगुरुजी रोड,देवळाली गाव रोड,नाशिक रोड येथील ६७ वर्षीय वृद्ध महिला, ३) वडनेर रोड,विहितगाव, नाशिक येथील ४३ वर्षीय पुरुष व्यक्ती, ४) त्रिमूर्ती चौक,सिडको येथील ३० वर्षीय महिला, ५) म्हसरूळ,नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष, ६) जेलरोड, नाशिक येथील ६६ वर्षीय वृद्ध महिला असा समावेश आहे.