नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २४ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ४३ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी ६७७ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३१६, नाशिक ग्रामीण: ३५० तर मालेगाव: ११ असा समावेश आहे. जिल्ह्यात सोमवारी ४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २१, नाशिक ग्रामीण: १७ तर मालेगाव: ५ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण १३४९ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.