नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २४ जुलै) कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २४ जुलै) कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २४ जुलै) कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २४ जुलै) एकूण १०५ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ६२, नाशिक ग्रामीण: ४०, तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण २ जणांचा कोरोनामुले मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण १३९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे. अशा आपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ झाल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.