जिल्ह्यात आजपर्यंत ९४ हजार २५३ रुग्ण कोरोनामुक्त; २ हजार ६११ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९४  हजार २५३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २ हजार ६११ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ७६५   रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ९१, चांदवड ७५, सिन्नर २५१, दिंडोरी ४२, निफाड २३७, देवळा ३१, नांदगांव ६८, येवला ११, त्र्यंबकेश्वर २८, सुरगाणा ०२, पेठ ०३, कळवण १७,  बागलाण ५२, इगतपुरी २४, मालेगांव ग्रामीण ३२ असे एकूण ९६४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५३९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८९ तर जिल्ह्याबाहेरील १९  असे एकूण २ हजार ६११  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ९८  हजार ६२९ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४.३०,  टक्के, नाशिक शहरात ९६.२६ टक्के, मालेगाव मध्ये  ९३.९०  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.३९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.५६  इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ६५६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८९७ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७१  व जिल्हा बाहेरील ४१ अशा एकूण १ हजार ७६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.