नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २२ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २२ जून) १८३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५१, नाशिक ग्रामीण: १२८ तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. तर गेल्या ४८ तासात ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ४ तर नाशिक ग्रामीण: ३ असा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.