नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २२ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २२ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २२ जुलै २०२१) एकूण ८९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १६, नाशिक ग्रामीण: ७०, तर मालेगाव ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात एकूण १०४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. अशातच भगूर परिसरात डेंग्यू आणि चिकन गुनियाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात आणि परिसरात डास वाढणार नाही या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे.