नाशिक जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा काही कमी होत नाहीये.. शिवाय ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २० मार्च २०२१) तब्बल २३८३ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १३९९, नाशिक ग्रामिण: ७८५, मालेगाव: १६६ तर जिल्हा बाह्य: ३३ इतक्या रुग्णांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहर:३ तर नाशिक ग्रामिणमधील ५ रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १)फ्लॅट क्र.२०१,जयमल्हार अपार्टमेंट,खुटवड नगर,नाशिक येथील ८३ वर्षीय वृद्ध महिला, २) फ्लॅट क्र.९,तेजल क्लासिक,पाथर्डी फाटा,नाशिक येथील ६० वर्षीय पुरुष ३) प्लॉट क्र.२३६,एन.३६/ए चिंटू भवन,खुटवड नगर, त्रिमूर्ती चौक, नाशिक येथील ९० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.