नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २ जुलै) २०१ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १०६, नाशिक ग्रामीण: ९३ तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: ३ असा समावेश आहे. शिवाय नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २३८ इतके कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक शहरातील कोरोना रुग्णांचा संख्येत किरकोळ प्रमाणात वाढ झाली आहे. अजून सुद्धा सगळ्यांनी कोरोनाचे प्राथमिक नियम काटेकोरपणे पाळले, तरी ही संख्या अजून कमी होऊ शकते. आणि आपण कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालू शकतो.