नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २ एप्रिल) कोरोना रुग्णांमध्ये वाढ; १८ जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २ एप्रिल) ३९९५ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २३०५, नाशिक ग्रामीण: १५१३, मालेगाव: ११६, जिल्हा बाह्य: ६१ असा समावेश आहे.

तर एकूण १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहर: ६, मालेगाव: ३, नाशिक ग्रामीण: ८ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.