अबब.. नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या शुक्रवारी (दि. १९ मार्च) रुग्णांमध्ये पुन्हा वाढ..!

नाशिक जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये शुक्रवारी (दि. १९ मार्च) पुन्हा वाढ झाली आहे..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १९ मार्च) कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात तब्बल २५०८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १४१४, नाशिक ग्रामिण: ८५३, मालेगाव: १८२ तर जिल्हा बाह्य ५९ अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे, यात नाशिक शहर: १, नाशिक ग्रामिण: ३ तर जिल्हा बाह्य १ असा समावेश आहे.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: समर्थ अपार्टमेंट,जेलरोड प्लॉट क्र.४, तुलसी पार्क, शिवाजीनगर नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.