नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १९ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १९ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी ११४ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५१, नाशिक ग्रामीण: ५६, मालेगाव: ३ तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १, मालेगाव: १, नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण २३१ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक शहरात सोमवारपासून पुढील आदेश येईपर्यंत सायंकाळी चार वाजेपर्यंत मॉल्स खुले असणार आहेत. मात्र मॉल्समधील कर्मचारी आणि ग्राहकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. नाशिक कॉलिंग आवाहन करत आहे की फक्त मॉल्सच नाही तर इतर ठिकाणी फिरतांना सुद्धा शासनाच्या नियमांचे पालन करा. जेणेकरून आपल्याला संभाव्य तिसरी लाट रोखता येईल..!