नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. 18 फेब्रुवारी) कोरोना रुग्णांच्या संख्येत 297 ने वाढ झाली आहे तर त्यापैकी नाशिक शहरात 205 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर नाशिक ग्रामीण मध्ये 73, मालेगाव मनपामध्ये 12 आणि जिल्हा बाह्य मध्ये 7 अशी संख्या आहे. तर नाशिक शहरात २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शिवाय नाशिक शहरात सध्या ७३७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत तर नाशिक ग्रामीणमध्ये ४३८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.