नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १४ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १४ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १४ ऑगस्ट) एकूण १०८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५०, नाशिक ग्रामीण: ५५, मालेगाव: ० तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १४ ऑगस्ट) एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ११६ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. मात्र निर्बंध उठविण्यात आले असले तरी, नागरीकांनी सर्तकता बाळगावी. आजही अनेक जिल्हयात रूग्णसंख्या वाढते आहे. व्यक्तिगत पातळीवर नियम पाळूनच आपण दूरगामी परिणाम साधू शकू, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

नाशिकच्या ह्या महत्वाच्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
रविवारपासून (दि. १५ ऑगस्ट) नाशिक जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये महत्वाचे बदल!
सिडको परिसरात रविवारी (दि. १५ ऑगस्ट) या ठिकाणी रक्तदान शिबीर