नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १३ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ३४ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी २२७६ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ९९९, नाशिक ग्रामीण: १२६८ तर मालेगाव: ९ असा समावेश आहे. शिवाय नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ३४ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: १२, नाशिक ग्रामीण: २०, मालेगाव: २ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ७५१८ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.