नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १२ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १२ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १२ सप्टेंबर) एकूण ९८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २६, नाशिक ग्रामीण: ५९, तर जिल्हा बाह्य: १३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी नाशिक शहरातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १२ सप्टेंबर) एकूण १३९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

गणेशोत्सव सुरु झाल्यापासून बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. मात्र ह्या गर्दीत अनेकांना मास्कचा विसर पडला आहे. अशातच मास्क न घालणाऱ्यांविरोधात नाशिक महानगरपालिकेची कारवाईसुद्धा आता थंडावलेली दिसत आहे. त्यामुळे आता आपण तिसऱ्या लाटेला आमंत्रण देतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरात सोमवारी (दि. १३ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !