नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १२ मार्च) ११३५ कोरोना पॉझिटिव्ह; ८ जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १२ मार्च) ११३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर  ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहर: ८४४, नाशिक ग्रामीण: २१३, मालेगाव: ५५ तर जिल्हा बाह्य: २३ असा समावेश आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहर: ३, मालेगाव: १, नाशिक ग्रामीण: ४ असा समवेश आहे.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृयू झालेल्या रुग्णांची माहिती: १) पंचम हौसिंग सोसायटी, सद्गुरू नगर, नाशिकरोड येथील ७२ वर्षीय पुरुष, २) तुलसी रो हाऊस, फ्लॅट क्र १२, पाथर्डी फाटा येथील ७२ वर्षीय पुरुष , ३) ६, गिरीजा अपार्टमेंट,राजेबहाद्दर कंपाऊंड, एम.जी.रोड नाशिक येथील ८१ वर्षीय वृद्ध महिला असा समावेश आहे.