नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ११ मे) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ३८ मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी २१८७ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १५४६, नाशिक ग्रामीण: ६२०, मालेगाव: ६, जिल्हा बाह्य: १५ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे एकूण ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ७, नाशिक ग्रामीण: ३० तर मालेगाव: १ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ५३८५ इतके कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates