नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १० मे) कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; ३२ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी कोरोना ९७३ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ९७३, नाशिक ग्रामीण: ८१८, मालेगाव: २५ तर जिल्हा बाह्य: १९ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी कोरोनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ७, नाशिक ग्रामीण: २५ असा समावेश आहे.

याशिवाय नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण २८८३ इतके कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.