नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १० जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १० जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १० जुलै) १३४ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ५८, नाशिक ग्रामीण: ७६, असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १० जुलै) एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ० तर नाशिक ग्रामीण: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण १७१ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. अशातच संभाव्य तिसऱ्या लाटेची  शक्यता, तसेच  डेल्टा प्लस, लॅम्बडा यासारखे कोरोनाचे नवे व्हेरीयंटचे संक्रमण लक्षात घेता कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनांसह उद्योगधंदे सुरू राहण्यासाठी  ऑक्सिजन साठ्याचे नियोजन करण्याचे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.