नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये शनिवारी (दि. १ मे) इतकी वाढ; ३८ मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये शनिवारी वाढ झाली आहे तर ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

corona nashik news

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १ मे) ३४१२ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १८२६, नाशिक ग्रामीण: १५०३, मालेगाव: ३४ तर जिल्हा बाह्य: ४९ असा समावेश आहे. तर शनिवारी नाशिक जिल्ह्यात एकूण ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात नाशिक शहर: ११, नाशिक ग्रामीण: २१, मालेगाव: ६ तर जिल्हा बाह्य: शून्य असा समावेश आहे.

त्याचप्रमाणे शनिवारी नाशिक जिल्ह्यात एकूण ६१०४ इतके कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. नाशिक शहराचा कोरोनाबाधीतांचा आकडा स्थिरावला असला तरी गाफिलपणा करून चालणार नाही, अजून काळजी घ्यावीच लागणार आहे.