रेमीडीसिविर मिळाले नाही तर मृत्यू अटळ ही भावना चुकीची – जिल्हाधिकारी

रेमीडीसिविर मिळाले नाही तर मृत्यू अटळ ही भावना चुकीची – जिल्हाधिकारी

नाशिक (प्रतिनिधी): रेमीडीसिविर मिळाले की 100% बरे होणार आणि नाही मिळाले की मृत्यु अटळ अशी वस्तुस्थिती अजिबात नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, “जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासामध्ये रेमीडीसिविर कोविड-19 उपचारांमध्ये केवळ काही अंशी गुणकारी आहे असे दिसून आले आहे. त्यामुळे रेमीडीसिविर मिळाले की 100% बरे होणार आणि नाही मिळाले की मृत्यु अटळ अशी वस्तुस्थिती अजिबात नाही. परंतु ते मिळत नाही या हतबलतेमुळे मानसिक आघात होऊन बरेच जण खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या औषधाचा नेमका उपयोग कधी कसा व कितपत आहे हे सर्वांना समजणे आवश्यक आहे. सर्व डॉक्टरांनी आपल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना याबाबत वस्तुस्थिती अवगत करून देणे अभिप्रेत आहे.”