नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ८ मार्च) ६७५ कोरोना पॉझिटिव्ह; ६ जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ८ मार्च) ६७५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक शहर: ४५०, नाशिक ग्रामीण: १३७, मालेगाव: ७२, जिल्हा बाह्य: १६ अशा रुग्णांचा समावेश आहे. नाशिक शहरात ४ जणांचा तर ग्रामीणमध्ये २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची आजची संख्या ३८९ इतकी आहे. नाशिक शहरात आज कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे: १) गौरव अपार्टमेंट सहजीवन नगर पंचवटी, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिला, २) महाराणा प्रताप चौक सिडको,नाशिक येथील ८४ वर्षीय वृद्ध पुरुष ३) शांतीनगर हिरावाडी येथील ७४ वर्षीय वृद्ध पुरुष ४) पंचकृष्ण अपार्टमेंट, राधाकृष्ण नगर, अशोकनगर,सातपूर येथील ५६ वर्षीय पुरुष व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.