नाशिक शहरात कोरोनाचा दुसरा बळी

नाशिक(प्रतिनिधी): शहरात आज (दि. 9 मे 2020) कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. कोणार्क नगर येथिल रहिवासी असणारे 51 वर्षीय पोलीस कर्मचारी मालेगाव येथे ड्युटीवर होते. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसायला लागल्यामुळे 2 मे रोजी नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ताबडतोब उपचार सुरु झाले होते. उपचारादरम्यान त्यांची तब्येत चांगली होती. मात्र आज सकाळपासून त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. आणि त्यांच्यावर होत असलेल्या उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.