नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील मेन येथील धुमाळ पॉईट येथे अनेक कापड दुकान आहेत. येथील चौकातील राजेशाही या कापड दुकानाला शॉर्टसर्किटमुळे रविवारी अचानक आग लागली. या आगीत दुकानातील कपडे आणि फर्निचर जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तात्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले.
आगीबाबत माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथील 1 व पंचवटी अग्निशमन दल येथील असे दोन बंब दाखल होऊन जवळ जवळ अर्धा तास सुरू असलेल्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्व दुकाने बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही…