जिल्ह्यात आजपर्यंत 9 हजार 402 रुग्ण कोरोनामुक्त; 2 हजार 650 रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९ हजार ४०२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरु असून  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २० ने  रुग्ण संख्या कमी झाली आहे.  आत्तापर्यंत ४६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक १६९, चांदवड ५३, सिन्नर ११०, दिंडोरी ४७, निफाड १४७, देवळा ४७,  नांदगांव ६६, येवला २६, त्र्यंबकेश्वर १७, सुरगाणा १३, पेठ ००, कळवण ०२,  बागलाण १९, इगतपुरी ८२, मालेगांव ग्रामीण ३१ असे एकूण   ८२९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७२७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८९  तर जिल्ह्याबाहेरील ०५  असे एकूण २ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १२  हजार ५१९ रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनामुळे आजपर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १११, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  २५३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४  व जिल्हा बाहेरील १९ अशा एकूण ४६७  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790