नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. 2८ जुलै) १६८ पॉझिटिव्ह; शहरात १२२ तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (जिल्हा प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २७ जुलै) एकूण १६८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात ग्रामीण ४५, नाशिक शहर १२२, मालेगाव ०१, जिल्हा बाह्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ५ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रात ३, नाशिक ग्रामीणमध्ये २ मृत्यू झाले आहेत. तर जिल्ह्यात सोमवारी एकूण ४७३ रुग्ण बरे झाले आहेत.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ३५१ एकूण कोरोना  रुग्ण:-८०४१ एकूण मृत्यू:-२५६(आजचे मृत्यू ०३)  घरी सोडलेले रुग्ण :- ६२५८ उपचार घेत असलेले रुग्ण:- १५२७ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

नाशिक शहरात मंगळवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

नाशिक शहरात मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) अविनाश अपार्टमेंट,बलराम नगर, धात्रक फाटा, पंचवटी येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.२) श्रीकृष्ण निवास, निगळ गल्ली, सातपूर नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.३)चैतन्य संगम अपार्टमेंट,काठे गल्ली, नाशिक येथील ३४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.