आजपर्यंत जिल्ह्यातील 728 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह; जिल्ह्यात 142 पॉझिटिव्ह

नाशिक(प्रतिनिधी): आज (25 एप्रिल 2020) सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना साथरोग बाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त झाला असून त्यात आजपर्यंत जिल्ह्यातील 728 संसर्गितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर आतापर्यंत एकूण 142 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज नव्याने मालेगावात 8 पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढली आहे. आज अखेर 262 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत.

हे ही वाचा:  जलसमृद्ध नाशिक अभियानाचा शुभारंभ; विविध संस्थांची साथ

जिल्ह्यातून दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले असून 12 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. सद्य:स्थितीत नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 11 रुग्ण कोरोना संक्रमित असून त्यातील 01 रुग्ण पूर्णपणे बरा होऊन कोरोना मुक्त झाला आहे. नाशिक ग्रामीण भागातून 05 रुग्ण कोरोना बाधित असून त्यातील एक रुग्ण पूर्णतः बरं होऊन कोरोना मुक्त झाला आहे. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 126 कोरोना संक्रमित असून त्यातील 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 142 कोरोना बाधित रुग्ण आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: स्वाईन फ्ल्यूचे 3 रुग्ण; एकाचा मृत्यू, दोघे ठणठणीत !

 (टीप : सदरची आकडेवारी ही 25 एप्रिल 2020 सायंकाळी 7 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790