सिन्नर, येवला, नाशिक शहर आणि मालेगावमधील रुग्णसंख्या वाढली !

नाशिक(प्रतिनिधी): आज (7 मे 2020) प्राप्त झालेल्या अहवालानुसार सिन्नर येथील एक, येवला येथील दोन आणि नाशिक शहरात अजून एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर मालेगावमध्ये अजून 4 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. एकीकडे नाशिक शहरातील रुग्णसंख्या वाढत असतांना, दुसरीकडे दुकानं उघडण्याची मुभा दिल्याने रस्त्यांवरची वर्दळ ही प्रचंड वाढली आहे.

आज दुपारी साडेबारा वाजता जिल्ह्यातील नवीन अहवाल प्राप्त झाले आहेत. या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये सिन्नर येथील 30 वर्षीय पुरुष, येवला ( मौलाना आझाद रोड) येथील 17 वर्षीय मुलगी आणि 13 वर्षीय मुलगा, नाशिक शहरातून समता नगर भागातील 19 वर्षीय मुलगा यांचा समावेश आहे. तर अशोका हॉस्पिटल येथील सर्व 27 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तर मालेगावमधून सिद्धार्थ नगर येथील 60 वर्षीय महिला, गुलशेर नगर येथील 1 वर्षाचा तान्हुला आणि 32 वर्षीय पुरुष, नुमानी नगर येथील 42 वर्षीय पुरुष यांचा पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे.