जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; चार आरोपींना सात वर्षांची शिक्षा

नाशिक (प्रतिनिधी): मोबाइल चोरी करण्यासाठी नेऊ नका अशी विनंती करणाऱ्या तरुणाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयाने सुनावली. दीपक कारभारी शेळके, संतोष कारभारी शेळके, पारूबाई कारभारी शेळके आणि विक्की ऊर्फ विलास सुरेश खिची असे या शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
१५ जानेवारी २०१४ रोजी फिर्यादी खंडू बस्ते (रा. फुलेनगर) यांनी तक्रार दिली होती. पत्नी सोनाली, मेव्हणा ऋतिक, हरिष आरोपीच्या घरी गेले. ऋतिक यास मोबाइल चोरी करण्यासाठी घेऊ नका जाऊ अशी विनवणी केली. आरोपींनी त्याला बेदम मारहाण करत चाकूने वार केले.

हे ही वाचा:  नाशिक: फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून सोमेश्‍वर धबधब्यात पडल्याने युवतीचा मृत्यू