नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिख्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून दिवस रात्र एक करून योग्य नियोजन करणारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे..

गेल्या दीड वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात देखील कोरोनाने चांगलंच थैमान घातले होते, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मोठं आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले होते. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या योग्य नियोजनामुळे आज जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. परंतु आता नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनाच आता कोरोनाची लागण झाली आहे.

त्यातच काल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटीची विशेष बैठक पंचवटी येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व शासकीय उच्च अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे संपर्कात आलेल्यांनी देखील आपली स्वतःची काळजी घेऊन कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. ते या कोरोना आजारावर लवकरच मात करतील असा विश्वास नाशिककरांना आहे.