नाशिक जिल्ह्यातही बर्ड फ्ल्यूचा शिरकाव !

नाशिक (प्रतिनिधी): सटाणा तालुक्यातील वाठोडा गावातील घरगुती पाळीव कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण दिसून आले आहे, त्यामुळे एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्या परिसरात कोणतेही व्यावसायिक पोल्ट्रीफार्म नाहीत. त्यामुळे अद्याप घाबरून जाण्याचे कारण नाही. पोल्ट्री संदर्भात योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना सर्व पोल्ट्री धारकांना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.