अभिमानास्पद: नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुभवा हवाई थरार !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या इतिहासात प्रथमच नागरिकांना हवाई खेळांची संधी मार्च महिन्यापासून उपलब्ध होणार आहे. म्हणजेच एअर स्पोर्ट्सच्या अनुभावासोबातच हवाई क्षेत्राची माहिती आणि संशोधनाची माहिती नाशिककर आणि विद्यार्थ्यांना मिळणार आहे. एअर स्पोर्ट्सची जिज्ञासा असणाऱ्यांना हि सुवर्णसंधी आहे…

नाशिक शहरापासून जवळच असलेल्या एका डोंगराजवळ एका अस्सल नाशिककराने एअर स्पोर्ट्स सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्व परवानग्यासुद्धा प्राप्त झालेल्या आहेत.

या एअर स्पोर्ट्समध्ये पॅरासेलिंग, पॅरामोटर ग्लायडर व स्मॉल एरो मॉडेल यांचा समावेश आहे. पॅरामोटर ग्लायडर व स्मॉल एरो मॉडेल असणारे नाशिक हे पहिलेच शहर ठरणार आहे. येत्या मार्च महिन्यामध्ये या एअर स्पोर्ट्स अंतर्गत काही दिवस विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठीही कार्यक्रम होणार आहेत. यात हवाई खेळ खेळण्यासह विमान बनविण्याचे तंत्र याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

आणि लवकरच एरो मॉडेल्समध्ये हवाई सैर करण्याचा थरारसुद्धा अनुभवायला मिळणार आहे.. सोबतच हवाई क्षेत्रातील करिअरबाबत या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.