कोरोनामुळे नोटप्रेस आता ३१ मेपर्यंत बंद

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनामुळे येथील इंडिया सिक्युरिटी आणि करन्सी नोट प्रेस आता ३१ मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कामगारांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मजदूर संघाने प्रेस प्रशासनासोबत चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचे मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी सांगितले.

दरम्यान, परिस्थिती व्यवस्थित राहिली आणि सरकारने नवीन निर्देश दिले नाही तर १ जूनपासून दोन्ही प्रेस नियमितपणे सुरू होतील. या कालावधीत गरजेप्रमाणे अत्यावश्यक काम करून दिले जाईल. त्यासाठी आवश्यक असलेल्या कामगारांना बोलावून घेतले जाईल, असे गोडसे यांनी सांगितले.