कोरोनाचा संसर्ग; नोटप्रेस ३० पर्यंत राहणार बंद

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लाॅकडाऊन असून देशाला चलनाचा पुरवठा करणारे इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेसही ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे प्रेस व्यवस्थापनाने सांगितले.

मात्र या काळात प्रेसच्या अत्यावश्यक सेवेतील अग्रिशमन दल, पाणीपुरवठा आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचारी हे शिफ्टनुसार कामावर हजर राहणार आहेत. दोन्ही प्रेस मिळून किमान तीन हजार कामगार असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे म्हणाले, प्रेस प्रशासन आणि मजदूर संघाने मिळून निर्णय घेतला आहे. सध्या १० ते ५०० रुपयांच्या सुमारे अकराशे दशलक्ष नोटा उपलब्ध असल्याने देशात चलनाचा तुटवडा भासणार नाही.