शनिवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची हिस्ट्री

नाशिक(प्रतिनिधी): शहरात शनिवारी आढळून आलेल्या रुग्णांची हिस्ट्री आपण जाणून घेऊ या..

नाईकवाडी पुरा  येथील महिलेच्या संपर्कात  ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून (त्यात २९ वर्षीय पुरुष असून २१ वर्षीय २ व ७८ वर्षीय अश्या ३ महिलांचा समावेश आहे.) शिवाजीवाडी येथील किराणा दुकानदार रुग्णाच्या संपर्कातील एका १७ वर्षीय युवकाचा  अहवाल कोरोना बाधीत असल्याचा आला असून आगर टाकळी येथील रहिवाशी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत आरोग्य सेवकाचा आज दि.२३ मे २०२० रोजी अहवाल कोरोना बाधीत असल्याचा आला असून त्यांचे निधन काल दि.२२ मे २०२० रोजी  झालेले आहे.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू