उत्तरप्रदेशच्या 705 नागरिकांना नाशिक महापालिकेने रेल्वेने पाठवले..!

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिके मार्फत नाशिक शहरातील विविध भागातील उत्तरप्रदेशच्या  705 नागरिकांना त्यांच्या मूळ गावी विशेष रेल्वेने पाठवण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाने विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 705 नागरिक आज 28 मे 2020 रोजी दुपारी 3 वाजता विशेष रेल्वेने उत्तर प्रदेश मध्ये पाठवण्यात आले.

रेल्वे स्थानकावर या नागरिकांना नेण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती.या सर्व वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच रेल्वे तिकीट बुकिंग प्रशासनामार्फत करण्यात आले.  तसेच रेल्वे स्थानकात व रेल्वे प्रवासात  फिजिकल डिस्टन्स राहील या बाबत दक्षता घेण्यात आली. या सर्व नागरिकांना पाठवण्यापूर्वी  मनपाचे वैद्यकीय पथकाने त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या नागरिकांना आज दुपारचे जेवण देण्यात आले  तसेच त्यांना प्रवासात पाणी बॉटल,सुके खाद्यपदार्थ अशा स्वरूपाचा नाष्टा सोबत देण्याची व्यवस्था  उपायुक्त अर्चना तांबे यांनी याबाबत नियोजन केले व मनपा शिक्षण समितीचे अधिकारी ,कर्मचारी यांची यावेळी उपस्थित होते.