नाशिक शहर अजून 2 पॉझिटिव्ह रुग्ण; उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 100

नाशिक(प्रतिनिधी): शहरात शुक्रवारी (दि. २९ मे २०२०) सकाळी अजून दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता नाशिक मनपा हद्दीत उपचार घेत असलेल्या एकून रुग्णांची संख्या १०० झाली आहे. नाशिक मनपामध्ये आतापर्यंत १५४ कोरोनाबाधीतांची नोंद झाली असून त्यापैकी बरे होऊन घरी सोडलेल्यांची संख्या ४६ आहे. तर ८ जणांच्या मृत्यू झाला आहे.

साईबाबा नगर,उत्तम नगर सिडको येथील ४५ वर्षीय महिला दि.२६ मे २०२० त्रास होत असल्याने इ एस आय सातपूर येथील रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाल्या असता त्यांचे नमुने घेण्यात आले ते आज दि २९ मे २०२० रोजी पॉझिटिव्ह आले आहेत. तर प्रमोद गल्ली जुने नाशिक येथील २१ वर्षीय युवक दि.२४ मे २०२० रोजी सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्यावेळी त्यांचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.