नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बदली !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर कैलास जाधव यांच्या नियुक्तीची चर्चा आहे. महापालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचार वाढत असल्याच्या तक्रारी विरोधकांनी केल्या होत्या. विरोधकांनी या भ्रष्टाचाराविरोधात रान उठविले होते. त्याचप्रमाणे गेल्या महिन्याभरात कोरोनाबाधीतांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढली होती. त्याचाच परिपाक म्हणून या बदलीकडे बघितले जात आहे.