सिविल मध्ये कंत्राटी कामगाराची अरेरावी; मुकादमला ठार मारण्याची धमकी

नाशिक (प्रतिनिधी): सिव्हील हॉस्पिटल मध्ये कंत्राटी कामगारांची मुजोरी दिवसंदिवस वाढत आहे. दोघं कंत्राटी कामगारांनी मुकादमला अरेरावी करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच या कामगारांकडून आरोग्य विभागाचे सिविल सर्जन यांचे बोगस ओळखपत्र हस्तगत करण्यात आले.

मुकादम मोहन महाले यांनी या दोघा आरोपींविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोघा कंत्राटी कामगारांना महाले यांनी काम सांगितले असता त्यांना त्याचा राग आला व त्यांनी मुकादम महाले यांना शिवीगाळ केली. तसेच सिविल हॉस्पिटलचे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांच्या सांगण्या वरून ठेकेदाराला सांगून संबंधित दोघे कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे.