मूल होत नाही म्हणून विवाहितेचा छळ

नाशिक (प्रतिनिधी): डोंबिवली ठाणे इस्ट येथील रहिवाशी व  नाशिक सातपूर येथे भावाकडे आल्येल्या विवाहितेला सासरच्या मंडळींनी गेल्या 22 वर्षांपासून आता पर्यंत तिची छळवणूक करत क्रूर वागणूक दिली. व ती भावाकडे आलेली असताना तिच्या नणंद यांनी महीले सहित तिचा माहेरच्या कुटुंबाला व मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

पीडितेची  संशयित सासू, रत्नमाला आनंदलाल गांधी, सासरे आनंदलाल कुबेर चंद गांधी, पती राजेश आनंद लाल गांधी व नणंद सोनाली श्रेयस कोठारी, यांनी महिलेला मुल होत नाही तसेच तिच्या  चारित्र्यावर संशय घेत, वाद करून तिला माहेर वरून पैसे आणावे याकरता वारंवार तिचा मानसिक व शारिरीक छळ केला . तसेच महिलेच्या नंदेने महिला भावाच्या घरी असताना रविवार दि. 14 जून २०२० रोजी तिथे जाऊन महिलेला शिवीगाळ करत महिलेच्या मुलासह तिच्या माहेरच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तक्रार नोंदविली असून, पुढील तपास पोलिस हवालदर सय्यद करत आहे.