महत्वाचे: नाशिक शहरातील या भागात शुक्रवारी (दि. १२ नोव्हेंबर) पाणीपुरवठा नाही

यंदाच्या थंडीत आपल्या घरी सोलर वॉटर हिटर बसवूनच घ्या. अधिक माहितीसाठी आम्हाला Whatsapp करा !

महत्वाचे: नाशिक शहरातील या भागात शुक्रवारी (दि. १२ नोव्हेंबर) पाणीपुरवठा नाही

नाशिक (प्रतिनिधी): शुक्रवारी म्हणजेच दि. १२ नोव्हेंबर रोजी पुढील भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचे नाशिक महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

पंचवटी विभागातील हिरावाडी येथील शक्तीनगर जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनी जोशीवाडा, रावाडी येथे हेवी लिकेज झालेले असल्याने सदरचे लिकेज बंद करणे कामी उर्ध्ववाहिनीचे दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे.

सदरचे काम शुक्रवार दि.12/11/2021, रोजी हाती घेण्यात येणार असल्याने हिरावाडी शक्तीनगर जलकुंभावरुन प्र.क्र.03, मधील हिरावाडी गावठाण, जोशीवाडा, शक्तीनगर, बनारसीनगर, भगवतीनगर, जनार्दन नगर, कॅनाल लगतचा विजय नगर परिसर, विधाते नगर, महाराष्ट्र कॉलनी, दामोदर नगर, क्षिरसागर कॉलनी, मौनगिरी नगर, हिरेनगर, गुंजाळबाब नगर, तसेच,

तांबोळी नगर, कमलनगर, अभिजीत नगर, शिवकृपा नगर, विठठलनगर, भन्साळी मळा, केशव नगर, त्रबंक नगर व जलकुंभ संबंधित परिसर इत्यादी परिसरातील शुक्रवार दि.12/11/2021 रोजीचा होणारा संध्याकाळचा पाणीपुरवठा व शनिवार दि.13/11/2021 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व संध्याकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याबाबत परिसरातील नगरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.