गुरुवारी (दि. 9 जुलै) संपूर्ण नाशिक शहरात पाणीपुरवठा नाही!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहर परिसरातील पाणीपुरवठा महावितरणाच्या कामकाजामुळे उद्या (दि.९) खंडित करण्यात येणार आहे. आणि शुक्रवारी (दि.१०) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

गंगापूर धरणाच्या जॅकवेलला जोडणारी वीजवाहिनी भूमिगत करणे आणि मुकणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व बदलण्याचे काम उद्या करण्यात येणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथून पंपिंग होणार नाही. म्हणून गुरुवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठ बंद राहणार आहे. आणि शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.